देवी देवतांची निष्ठा सकायासी
देवी देवतांची निष्ठा सकायासी ।
आम्ही नाही त्यासी मान देऊ ॥धृ॥
कोंबडे बकरे कापतील लोक ।
भोगतील भोग अंतकाळी ॥1॥
आम्हा जरी देवी मागेल बकरा ।
आम्हीच सामोरा होऊ तिच्या ॥2॥
तुकडयादास म्हणे देवी ती न मागे ।
लोभाचिया संगे काटे खाती ॥3॥