पुत्रा माय वधी कैसी ती दयाळ
पुत्रा माय वधी कैसी ती दयाळ ?।
आम्ही म्हणो काळ आली जगी ॥धृ॥
जीव जन देवी करीतसे जगी ।
काय तीच भंगी कोण सांगे ? ॥1॥
आम्हां भरवसा जरा नाही याचा ।
सर्व हा स्वार्थाचा डाव आहे ।।2॥
तुकड्यादास म्हणे देवी ना मागत ।
नाही या भागत घुमाऱ्याचे ॥3॥