देवी देवांनी हे पुत्र होते झाले । कासयासी केले रांडे ! पती ?
देवी देवांनी हे पुत्र होते झाले ।
कासयासी केले रांडे ! पती ? ॥धृ॥
कर्म-भोग नाही कुणासी चुकला ।
पूर्व जन्मी केला पाप-संग ॥1॥
भोगणे ते आहे वांझ होहूनिया ।
कासयासी वाया दुःख घेशी ॥2॥
सोड ही भावना स्मर नारायणा ।
दुःख जीवजना नको देऊ ॥3॥
तुकड्यादास म्हणे बळी देणे पाप ।
वाटेल संताप अधिक देवा ॥4॥