धर्माचे पालन करिती हे जन पाप हे नेत्राने पाहुनिया
धर्माचे पालन करिती हे जन
पाप हे नेत्राने पाहुनिया ॥धृ॥
प्रत्यक्ष हिंदुनी विकाव्या ह्या गायी ।
कापतां कसाई सुख वाटे ॥1॥
दौन रुक्यासाठी माते कां विकावे ? ।
जिने दूध द्यावे पुत्रासाठी ॥2॥
तुकड्यादास म्हणे याचि योगे कली ।
नेईल आपुली पुण्ये सारी ॥3॥