कृष्ण जन्मावया बहुदिन झाले ।

कृष्ण जन्मावया बहुदिन झाले ।
आता काय केले पाहिजे हे ? ॥धृ॥
ऐसे नव्हे, याचे कारण उत्तर । 
ऐका सविस्तर सांगो आम्ही ॥1॥
तयांचे चरित्र आठविता सर्व । 
हरतसे गर्व दुर्जनांचा ॥2॥
तुकड्यादास म्हणे बुद्धि होय शुद्ध । 
लागतो संबंध सद्गुणाचा ॥3॥