धन्य ते सुपुत्र विठ्ठलपंताचे
धन्य ते सुपुत्र विठ्ठलपंताचे ।
खदान हिन्याचे कुळी आले ॥धृ॥
पावली तपस्या पुत्ररूपे त्यांना ।
दिगंतरी जाणा कीर्ति झाली ॥1॥
निवृत्ति, सोपान, ज्ञानदेव तिघे
मुक्ता सहित चौघे बहिण भाऊ ॥2॥
तुकड्यांदास म्हण केला उपकार ।
आम्हा दीनावर तया पुत्रे ॥3॥