पुण्यक्षेत्र मनी वाढवी सुभाव । गुरु संत देव भक्ति यांची
पुण्यक्षेत्र मनी वाढवी सुभाव ।
गुरु संत देव भक्ति यांची ॥धृ॥
तेथील ही भूमी उद्धरिली संती ।
थोर भाग्यवती नगरी क्षेत्रे ॥1॥
जया गांवी राहे अखंड श्रीहरी ।
नामाच्या उच्चारी सीमा नाही ॥2॥
तुकड्यांदास म्हणे करा पायी तीर्थ ।
हदयी अनंत धरोनिया ॥3॥