बहु कालांतरे झाली तीर्थ क्षेत्रा । तेथील सर्वत्रा चाली गेल्या

बहु कालांतरे झाली तीर्थ क्षेत्रा । 
तेथील सर्वत्रा चाली गेल्या ॥धृ॥
पहावें तो स्थला झाले स्थलांतर । 
एकाचे अंतर एका नाही ॥1॥
पुराणांच्या मेळीं मिळविता ताळा 
उगीच कपाळा चीड वाटे ॥2॥
तुकङ्यादास म्हणे झाले विस्मरण । 
आपुलिये ध्यान विसरता ॥3॥