पुण्यक्षेत्रें झाली व्यापारांची खाण

पुण्यक्षेत्रें झाली व्यापारांची खाण । 
जरा माझे मन शांत नोहे ॥धृ॥
भोळिया भाविकां बहु त्रास देती । 
ब्राम्हणाने मती भ्रष्टविली ॥1॥
सदा हायहाय द्रव्याच्या चिंतनी । 
पुण्य करा कोणी ओरडती ॥2॥
तुकड्यादास म्हणे आपुली ऐपत । 
पाहोनी समस्त पाय टाका ॥3॥