कोण जाणे गड्यां ! आयुष्याचाकाळ । जाईल सकळ कैसा कैसा?

कोण जाणे गड्यां ! आयुष्याचाकाळ । 
जाईल सकळ कैसा कैसा? ॥धृ॥
कोठे राहो आम्ही कोठे रहा तुम्ही । 
सुखदुःख हानी कैसी होते ? ॥1॥
मानपान अन्न प्रारब्धा आधीन । 
आणि जन्म मरण तेही तैसे ॥2॥
तुकड्यादास म्हणे सर्व ठावे देवा । 
भार हा वहावा तया पायी ॥3॥