म्हणा मज काही मी तो झालो नंगा । लागलो या रंगा विठ्ठलाच्या

म्हणा मज काही मी तो झालो नंगा । 
लागलो या रंगा विठ्ठलाच्या ॥धृ॥
लाज नाही जंरा ठैविली शरीरी । 
झालो मी भिकारी दारी त्याच्या ॥1॥
विटलो मी जगा जग हे विटले । 
पारणे फिटले एकदाच ॥2॥
तुकडयादास म्हणे पाय हे सोडिना । 
जरि दुःखे नाना प्राप्त झाली ॥3॥