देव देव म्हणे देव काय करी ?

देव देव म्हणे देव काय करी ? । 
कर्मात भाकरी लिहिल्या दैवे ॥धृ॥
देवावरी भार टाकोनिया काय ? । 
वागतांना सोय नाही जरी ॥1॥
करावे ते पुढे भरावे आवडी । 
भोगी दुःखे गाडी वाटो नये ॥2॥
तुकड्यादास म्हणे दुःखे मिळे सुख । 
हाव हावे भूक जात नाही ॥3॥