पात्रापात्र प्रभु पाहे भाग्यशाली
पात्रापात्र प्रभु पाहे भाग्यशाली ।
सुकृते दिघली सुखदुःखे ॥धृ॥
जैसी ज्याची क्रिया तैसी त्याची माया
उद्धराया, काया कर्मालागी ॥1॥
एकासी श्रीमंती एक अधोगती ।
एक रंक होती पूर्व कर्मे ॥2॥
तुकड्यादास म्हणे जे जे करा कांही ।
पावाल ते सही चित्रगुप्ती ॥3॥