काय यासी केले पाप सूष्टीवरी

काय यासी केले पाप सूष्टीवरी । 
भोगायासी हरी लावी आम्हा ? ॥धृ॥
बहु ऐसे लोक म्हणती आम्हासी । 
सांगाहो देवासी जावोनिया ॥1॥
मी तया बोललो कराना का पाप । 
तयाचेही माप भोगू भोग ॥2॥
तुकड्यादास् म्हणे स्वर्ग-नर्क दोन । 
ठेविले आणोन कर्मासाठी ॥3॥