पाप प्रारब्धाने केले म्हणू नका ।

पाप प्रारब्धाने केले म्हणू नका । 
भोगावया नर्का घाली देव ॥धृ॥
विषयांच्या आशे झापडिले मने । 
तेथे प्रारब्धाने  काय केले ? ॥1॥
पुण्य केले आम्ही पाप होय दैवी । 
काय हे केशवी नसे ठावे ? ॥2॥
तुकड्यादास म्हणे आसक्ति कारणे । 
पाषा संचरणे घडे देही ॥3॥