नका कोणा म्हणू पापीनी चांडाळ

नका कोणा म्हणू पापीनी चांडाळ 
लौकरवि वेळ तुम्हां येई ॥धृ॥
आपुल्या शब्दांचा प्रतिध्वनि उठे । 
आपणासी भेटे एकाएकी ॥1॥
दुजा दुःख देता स्वये होऊ दुःखी । 
गोष्ट ही अनोखी ध्यानी ठेवा ॥2॥
तुकड्यादास म्हणे नका पाहू दोष । 
सांगा सावकाश शांत बुद्धी ॥3॥