नका दुःखवु कोणा दुःखी व्हाल तुम्ही

नका दुःखवु कोणा दुःखी व्हाल तुम्ही । 
जिरेल ही उर्मी क्षणामाजी ॥धृ॥
देवासी सहन होत नाही ऐसे । 
लावतील पिसे अंगामाजी ॥1॥
रोग फुटतील सर्व अंगावरी । 
पैसा काय करी कोटवावधी ? ॥2॥
तुकड्यादास म्हणे बरे पहा आता । 
दुःखे दुःखवता पाप लागे ॥3॥