निववी हे नेत्र माझे, दे भेटी एकदा ।
(चालः शिणले हे नेत्र माझे...)
निववी हे नेत्र माझे, दे भेटी एकदा ।
व्याकुळ हा जीव झाला, भेटाया तव पदा ।।धृ०॥
शास्त्रे ही गाति गाणीं, प्रभु धावे धावणी ।
दुर्भाग्य काय माझे ? भेटेना येउनी ।।१।।
जरि पापी, दुष्ट आम्ही, निच याती जन्मलो ।
तरि नामे ईश्वराच्या, पद - कमली लाधलो ।।२।।
नुरलीसे आस काही, धन दारा - हाव हे ।
प्रभु-सेवा साधवावी, दृढ झाले भाव हे ।।३॥
बघ देवा ! एकदाची, दुर्भाग्या येउनी ।
तुकड्यासी ठाव देई, ही मागो मागणी ।।४ ॥