ये, सखया ! रामराया ! दे भेटी झडकरी

(चालः शिणले हे नेत्र माझे...)
ये, सखया ! रामराया ! दे  भेटी  झडकरी ।
ओरड ही ऐक माझी, ऐकविली अजवरी ।।धृ०।।
वनवासी देह झाला, मन,  बुध्दी   बावरी ।
आवरि ना काहि केल्या, किति सांगू तुज हरी ? ।।१॥
दुष्पापे पामरासी, किति घडली ही जरी ?
कनवाळू तू दीनाला,    क्षमवीसी     निर्भरी ।।२l।
भिति वाटे यापुढे ही पळविल का कुणि तरी ?
षड् रिपु हे आड येती, मज दिसताती अरी ।।३॥
डोंगर हे विषय वाटे, पडतिल का ये उरी ?
तुकड्यासी भीक देई, हे    मागो    आखरी ॥४॥