नरजन्म मिळोनी तुला, स्वस्थ बैसला
(चालः रे, नरा ! आत बघ जरा..)
नरजन्म मिळोनी तुला, स्वस्थ बैसला, क्षणिक भोगाया
करि अमर-सुखाची आस, पाहि गुरुराया ॥धृ०।।
कर संपादन रे ! ज्ञान, सोड अज्ञान, शाश्वती जाया ।
बघ भक्त जाहले किती गड्या ! बोधाया ॥
कर्तव्य नराचे पहा, स्वरुपी रहा, प्राप्त मोक्षा या ।
घे साधुनि अपरोक्षास, जात नर-काया ।
कर अता, स्वरुप-साम्यता, तोड ही माया।। करि अम0 ।।१।।
तुज कासयास धाडिले ? सर्व सोडिले, मूर्ख बनुनीया ।
रे, निर्लज्जा ! निज जन्म दवडिसी वाया ।।
अगा ? यात, पाहि नवनीत, उजळली वात, आत्म दावाया ।
नर - योनि श्रेष्ठ ती, केलि याच व्यवसाया ।
सोडनी घरीचा देव, मांडिला खेव, पाहि पर-काया ।
जाहला गरम, ना शरम द्वैत सोडाया ॥
रे, सावध होई नरा ! करी सोयरा, मैल काढाया ।। करि अम० ।।२।।
कुठवरी भटकसी असा, जाहला पिसा, धरुनि स्त्री माया।
रे, विषय -सुखाची गोडी न सुटे सखया !।।
सम-चरण धरी साजिरे, रुप गोजिरे, हरीसी गाया ।
हा जोडी प्रेमा धरी धरी निट पाया ।।
तव गीत सांगु मी किती, अरे ! अगणिती,न ये मोजाया ।
तो बोले तुकड्यादास अशाश्वत छाया ।।
मम नव्हे मुखीचा बोल,असे अनमोल, ग्रंथिचा घ्याया ।।करि0 ll३ll