निज नवल पाहसी किती ?

(चाल: रे, नरा! आत बघ जरा...)
निज नवल पाहसी किती ? असुनी सन्मती, मूर्ख बनतोसी ।
करि विचार आता जरा, नरा ! गुणराशी ! ॥धृ0।।
तव स्वरुप कसे फाकडे, कितिक साकडे, दूर ते करिसी ?
रे ! घेउनिया मळ अता शिरी का धरसी ? ।।
काढूनी फेक तो फोड, निखालस तोड, पापपुण्यासी ।
रे ! अघटित करणी, पहा तूच अविनासी ।।
का बुडसि गर्व घेउनि मीच अभिमानि क्षणिक सुख घेसी Iक0 ॥१॥
घेउनी अज्ञ-निद्रेस, लाविला पाश, गड्या ! अंगासी ।
लागला जन्म-मरणास, अंता गति कैसी ?।
नू कोण ? कुणाला भला व्यर्थ अडियला, बघुनि मायेसी ।
रे ! अशाश्वताला धरोनिया भुललासी ।
ही सोड अंता कल्पना, अन्य पाहुणा, नविन का येसी ?
रे ! नव्हते मायातत्व तुला पाहण्यासी ।।
हो स्वस्थ स्वप्न सोडूनी धरी रे ! मनी, निज-ब्रह्मासी ।। क०॥२।।
तू चैतन्याचा खडा असुनि कोरडा, मंद का होसी ?
समशेर जशी रे ! नवी, बसेना माशी ।।
अज्ञान-रुपा घेउनी, विसरला गुणी, बनुनि अध्यासी ।
प्रारब्ध घेउनी शिरी कुठे रडतोसी ? ॥
गुज सांगे तुकड्याभाट, पिटवुनी घाट,सुधर जन्मासी ।
रे ! पुन्हा न ये ही वेळ हजारो वर्षी ।।
तोडुनी द्वैत, पामरा ! ऐक्य हो बरा, निज स्वरुपासी ॥ क 0॥३॥