निघते पद एक धरी धरिता

(चालः आशक मस्त फकीर हुआ..)
निघते पद एक धरी धरिता, बघते रघुनाथ-पदा लवुनी ॥धृo।।
सवे लक्षमणा मिळुनी, जुळुनी, सति जात वना शरयूवरुनी ।
अति कोमल पाउल टाकतसे, शिरि चरचरली जलधार कणी ।।१॥
मुख लाल गुलाल परी सुकले, विखुरे शिरि केश मृदू पवनी ।
पति-वाक्य कराया पूर्णपणे,पथ चालतसे लगभाग वनी ।।२।।
हळु काढित शब्द मुखातुनिया, ती पर्णकुटी किति दूर अशी ?l
अति उष्ण दिवाकर तापतसे, सति चालतसे भिउनी भिउनी ।।३॥
कधि दार न पार करी घरचे, विधि-लेख असे न चुके तिजला ।
तुकड्या म्हणे काय चुकेल कुणा, हो सूर असूर कुणीहि जनी ? ।।४।।