भक्तिहीन मी पुरा अभागी, घे पदरी माते !

(चालः कसा निभवशी काळ..)
भक्तिहीन मी पुरा अभागी, घे   पदरी   माते !
काहि कळेना काय करावे, साधन तव परते ? llध्रुll
मनोभाव तव चरणी जडला, मम जगदामाई !
तुझ्यावाचुनी काहि कळेना, तूचि कृपा-सहाई  l।१।।
योग-याग, जप-नेम धर्म हे, न रुचे मज काही ।
जन्मापासुनि हेचि आवडे, मज   दुसरे  नाही ।।२।।
तुचि निभवशी काळ माय गे ! भाव पुरा माझा ।
जाणुनिया हे ब्रीद दयाळे ! ये   धावत   काजा ।।३॥
तुकड्यादासा नाम तुझे ते, दे हृदयी वाचे ।
हेचि मागतो निशिदिनि माते ! न प्रेम   इतराचे ॥४ ॥