भज रे ! भज गोविंद विहारी

(चालः गावो रिधसिध मंगल..)
भज रे ! भज गोविंद विहारी, तारिल तोचि दीना निर्धारी l।धृ०।।
निर्भयपद त्याविण जगि नाही, सांगति संत, पुराणे  सारी ॥१॥
अवघड हा भवसागर वाटे, मुक्ति मिळे स्मरताचि  मुरारी ।।२।।
धन-संपत्ती क्षणिक सुखाची, शेवटि तोचि भवातुनि तारी ॥३॥
तुकड्यादास म्हणे घे कानी, हृदयासनि  बसवी  भयहारी ॥४॥