मज हे नलगे वैभव माय !

(चालः आज मी ब्रह्म पाहिले...)
मज हे नलगे वैभव माय ! ॥ध्रुo॥
शाल-दुशाले, बांधुनि फेटे, अंती येईल  काय ? ॥१॥
धन-दारा, सुत भोगुनि राही, शेवटि धोका खाय॥२॥
त्रय दिवसांचा हत्ती-घोडा,   अंती   नंगा   जाय ।l३॥
शरिरा घालुनि लाडू-पेढे, शे्वटि   रौरवि   जाय ।I४॥
तुकड्यादासा ऐसा दे वर, धरिन    गुरुचे   पाय  ll५॥