भोगा आज मजा दिन - रात
(चालः आज मी ब्रह्म पाहिले..)
भोगा आज मजा दिन - रात ॥धृo।।
न मिळे ऐसी वेळा कधिही, होइल तनुचे खात ॥१॥
विषयसुखाला चाखुनि चाखुनि,शेवटी तो अध:पात ।।२।l
साजवुनी घ्या वैभव मोठे, जा मग ठोकर खात ।।३॥
धन सुत दारा प्रेमी तुमचे, सोसा ते आघात ।।४॥
काळ उभा केव्हाचा डखरी, बसला वाट पहात ? ।।५।।
धावा धावा करिता करिता, बुडविल गर्भ - घरात ।।६।।
तुकड्यादास म्हणे समजा गुज,नच खोटी मम मात।।७।।