भजनी मित्रपणा सोडावा

(चाल: अब में आपन प्रभू )
भजनी मित्रपणा सोडावा ।।धृ०।।
त्यागुनि मान अहंता सगळी, लीनपणा मनी घ्यावा ॥१॥
गर्व  न   संपत्तीचा   धरुनी,   इंश्वर   स्मरुनी  गावा ।।२l।
चित्त   सदा   एकांत   करुनी, इंश - प्रेम   साधावा ।l३॥
तुकड्यादास म्हणे श्रीहरि तो, वाणि- मनाने ध्यावा ॥४॥