निर्धार अजी ! गुरुवाणी

(चालः कुठवरी भोगशिल मौजा..)
निर्धार अजी ! गुरुवाणी, दाविली गुरुने नयनी जी ! ।।धृol।
मणीपूर एक शहर साजिरे, परा जियेची वाणी ।
उन्मनि-तार चमक उजियाला,अरुपी ज्योत- निशाणी जी ! ।।१।।
सोहं बाजा निशिदिनि चाले, डोले हंस विमानी ।
इडा-पिंगळा अमृत   फेकी,  अंबर   बुडले   ज्ञानी  जी ! I|२||
अनाहती वाजती चौघडे, दश - नादी  मधुवाणी ।
तुकड्यादास म्हणे मी भुललो, विरले मी-तू दोन्ही जी ! ।।३।।