भज भज तो रघुनाथ,अता तरि

(चाल: कसा निभवशी काळ. )
भज भज तो रघुनाथ,अता तरि सोड क्षणिक मात ।
अमर-सुखाची चाखुनि गोडी, निज-सुख घे डुलत ॥ध्रु।|
काय तुला हे वाटे निर्मळ ? विषयाला धरिशी ।
काळ उभा फाडुनी  मुखाते,   अंती    गुदमरशी ।l१।।
बहुत कराया पाप, कुबुद्धी दिधली तुज कोणी ?
नव्हती ऐसी निज कर्मांची, बघ रे ! तव  करणी ।।२।।
पावुनि सुख तव झाले जड हे, जगि या सुखवंत ।
अजपा टाकुनि धरिशी धोंडे,   नवलाची    मात ।।३॥
धर्म-नीतिला मानुनि खोटे, बुडवियला    पंथ ।
तुकड्यादास सांगतसे गुज, भज तो    रघुनाथ   ll४।।