मम अंतरि वाटले अता हो !

(चालः कसा निभवशी काळ..)
मम अंतरि वाटले अता हो ! पाहुनिया तुजला ।
सावध हो तुज म्हणती जन हे, तरि का गडबडला ? ।।धृ०।।
अजूनिया का स्वस्थ उभा रे ? करि प्रभुचे स्मरण ।
हरि दासांचा दास बनूनी, चुकवि  गड्या !   पतन  ll१।।
असुनि तुला पोहणे, बुडाला मृग-जळि का जाण ?
सर्व सुखाचे सुख भोगाया, करिशी का न  यत्न ? ।।२।।
नच ऐसी ही करणि तुझ्या कर्मात गङया ! अजुनी ।
त्वंपद तत्पद कैसे बघ   ते, मग    होशिल   ज्ञानी ।।३॥
तुकड्यादास सांगतसे गुज, नच ही मम वाणी ।
वर्णन   केले   ग्रंथी    भक्तां, तेचि    सांगु    कानी ॥४॥