प्रारब्धाचा वाद सोडूनी, भज श्रीगुरु आता ।
(चालः कसा निभवशी काळ..)
प्रारब्धाचा वाद सोडूनी, भज श्रीगुरु आता ।
अंतरिचे मळ करि रे ! निर्मळ, तूच जगत्राता ।।धृ०l।
जोवरि न सुटे द्वैत तुझे हे, तोवरि भवि बुडाला ।
न कळे ब्रह्मज्ञान तुला बघ, गुरुचरणि न गेला ।।१।।
अनंत जन्मी भटकत भटकत, आला नरकायी ।
त्याग अंता षड्विकार सर्वहि, हरि भज लवलाही ।।२॥
प्रबल तुझ्या त्या बहुत वासना, की तुटती त्वरित ।
हेचि करुनि घे साधन आता, दृढ धर रघुनाथ ।।३॥
तुकड्यादास सागतसे गुज, समज धरी काही ।
कर्मगती ती बदलायासी, हीच योनि पाही ।।४॥