कासया बनला पिसा ? निज विषय सेवुनिया गङ्या रे !

(चाल : क्यों नही देते हो दर्शन..)
कासया बनला पिसा ? निज विषय सेवुनिया गङ्या रे ! ।।धृ०।।
धर्म   नीती   सोडिली, तनु.  गर्भवासी  पाडिली ।
जन्म घेता धाडिली, यमद्वारी घेशिल का उङ्या रे ? ।l१।।
दुर्जनाच्या    संगती, सुटली    सुबुद्धीची   गती ।
होत पोटार्थी स्थिती, धर श्रीहरी हृदयी मढ्या रे ! ।।२।।
सोडूनी रज तम गुणा, लिन सत्वशिल हो शाहणा ।
मारि द्वैता वाहणा, कर पाठ  आता या धड्या रे ! ।।३।।
सद्गुरु धरुनी मनी, इच्छादिचा ना   हो  ऋणी ।
धर आज अजपाची कणी,तुकड्या म्हणे उठ सौंगड्या रे ! ।।४।।