प्रभु ! मंगलमय तव नाम सदा
(चालः अजि! कौन जगह जगने की है...)
प्रभू ! मंगलमय तव नाम सदा ।।धृo।।
सतत हृदयि या जपता भावे, पूर्ण करिशि हरि ! काम सदा ।।१।।
भव-सागर हा तरण्या दूर्धर, नामचि दे आराम सदा ।।२।।
किति तरि तरले नाम-प्रतापे, गर्जत शास्त्र -पुराण सदा ।।३।।
तुकड्यादास म्हणे निरभय मी, स्मरता पाविन धाम सदा ।।४।।