मन मोहुनि ने गिरिंधारी, गिरिधारी गा !

(चाल: अशि घाल गळा मिठि बाळा...)
मन मोहुनि ने गिरिंधारी, गिरिधारी गा ! ।।धृ०।।
कही सुचेना काम-धाम हे, एकच लागे.  तारी   गा ! ।।१।।
चित्त रमे ध्याता ती मूर्ति, होत निशा अति भारी गा ! ॥२॥
संसाराचे भान न राहे, मुरली विषय - बिमारी   गा ! ।।३॥
तुड्यादास म्हणे मी वेडा, हरि-बन्सी अति प्यारी गा ! ॥४॥