माझा सावळा मुरारी, बंसी वाजवी मधूरी

(चालः राधे ! इतुका कशाला...)
माझा सावळा मुरारी, बंसी वाजवी मधूरी ।।धृ०।।
कोणि म्हणे हा जादू करतो, कोणि म्हणे हा चित्त चोरतो ।
गोपी - वेड लावणारी ।। बंसी0।।१।।
योगी ध्यानी धरुनी बसती, कुंठुनि गेली शास्त्राचि मती ।
कंसा घाव घालणारी ।। बंसी 0ll२ll
यमुनाकाठी चारत गायी, खेळत गोपाळा - समुदायी ।
वाटे शंकरास प्यारी ।। बंसी0।।३।।
तुकड्यादास म्हणे मन मोही, तल्लिन करितो दाहि दिशाही ।
दुःखे, संकटे निवारी ।। बंसी 0I|४|।