भोळ्या गिरिजा-वराला, ध्या रे ! प्रिय शंकराला

(चाल: राधे ! इतुका कशाला...)
भोळ्या गिरिजा-वराला, ध्या रे ! प्रिय शंकराला ।।धृ०।।
व्याघ्रासन-भूषण कटि बांधी, सदा अखंडित राहि समाधी ।
अंगी भस्म  लावलेला ।। ध्या रे0 ।|१।।
वाजत भं भं डमरु-भेरी, नाचति भूत-पिशाच्चे सारी ।
भाळी  चंद्र   लावलेला ।। ध्या रे0 ll२।।
नंदी-स्वार अखंडित राहे, झुळझुळ गंगा मस्तकि वाहे ।
शोभे नील कंठ ज्याला ।। ध्या रे0 ।|३।।
मस्त सदा ध्यानी रत डोले, वदनी राम राम पद बोले ।
तुकड्या वंदितो पदाला ।। ध्या रे0।।४।।