भ्रम-मोचन भव-तारक स्वामी, निशिदिनी मनि आठवी

(चाल: माया भरल्या या जगती..)
भ्रम-मोचन भव-तारक स्वामी, निशिदिनी मनि आठवी ।।धृ०।।
श्रवणी, मननी निजध्यासनी, सदगुरु- गुण साठवी l।१।।
जागृति-स्वप्न-सुषुप्ती-तुर्यी, निजरुपि मन आठवी ।।२।।
स्थूल-सूक्ष्म-कारण-महाकारणि, चैतन्यघन गाठवी ॥३॥
पंच विषय त्यागुनिया चित्ती, गुरुपद - रस चाटवी ।।४॥
रीघ नसे कळि-काळ यमासी, स्मरणी जप दाटवी ॥५॥
तुकड्यादास गुरुपद मागे, गुरुविण कुणि  नाठवी ।।६।।