नलगे मज हे नलगे मज ते, मज द्या हे ते सोडुनिया रे !
(चाल: गुरु तुमहि तो हो,
नलगे मज हे नलगे मज ते, मज द्या हे ते सोडुनिया रे ! ।।धृ०।।
द्वैत-भाव हा देहि नुरावा, विमल करा मोडुनिया रे ! ।|१।।
ठायिच ज्ञाता-ज्ञान हारपे, दृष्टी-सुख तोडुनिया रे ! ।|२।।
लवण विरे जै,भासहि हरती, ऐक्य रुपी जोडुनिया रे ! ॥३॥
भावाभाव उरे ना जेथे, जीवपणा फोड़ुनिया रे ! ll४॥
तुकड्यादास मौन मौनावे, परोक्ष हा खोडुनिया रे ! ll५।l