न आवडता तुला दास, म्हणुनिया दूर का धरिशी ?

(चाल अगर है पाना)
न आवडता तुला दास, म्हणुनिया दूर का धरिशी ?॥ध्रुl।
पुरेसे जाहले भक्त, सकळही होत   ना   मुक्त ।
हरि मी विषयि आसक्त, अता   देई    मला   फासी ।।१।।
ब्रिदासाठी कसा पाठी, धरीसी दास   संकष्टी ।
अता का जाहली दाटी ? कि माझे   भाग्य   दुरदेशी l।२॥
पुरविसी वस्र प्रेमाने, प्रसन्नचि होशि स्मरणाने ।
अता का दास रागाने, हरी   रे ।    दूर    लोटियसी ? ।l३।।
बहू म्हणती हरि दाता, जि ! पावन होतसे स्मरता ।
म्हणे तुकड्या अता नाथा ! दीनाला कासया भुलसी ? ।l४l।