बहू मी जाहलो वेडा, हरी
(चाल: अगर है ग्यानको पाना..)
बहू मी जाहलो वेडा, हरी ! तब योग - मायेने ॥धृ०॥
करु कैसे अता स्वामी ! नसे नन तूझिया नामी ।
करा सेवापथी प्रेमी, मला देऊनि वरदाने ।।१॥
बहू भक्तात हा वाद, मिळे स्वामी धरा नाद ।
कसा तो नीज-आनंद, मिळे का आडरानाने ? ।।२।।
मना वाटे हरी ! आता, त्यजू की प्राण जगत्राता !
धावुनी जानकी - नाथा ! पुरविसी वस्त प्रेमाने ।।३॥
म्हणे तुकड्या धरी पदरी, नसे तुजवीण आधारी ।
ही तोडा पुनरपी फेरी, जी ! तारा दास चरणाने।।४।।