निजदास तुझा शरण तुला रे ! हे श्री गणराया !

(चाल: पतीत पावन नाम ऐकुनी...)
निजदास तुझा शरण तुला रे ! हे श्री गणराया !
बुध्दि देई मज सखया सगुणा ! तव सदगुण गाया ॥धृ०॥
मूर्ति मनोहर पाहुनि सुंदर, मन   आनंदियले l    
चर्चियला शेंदूर   सर्वांगी, झळकति   कुंडियले ॥१॥
नमिती तुजला हरिहरब्रह्मा, देऊनिया   मान ।
सुमंगल तुझे नाम गड्या रे ! वाहु सुमन-सुमन ।।२।।
रिध्दी- सिद्धी दासी होउनि, लोळति तव चरणी ।
पुरवी मम कामना, करी भव नदी - पार धरुनी ।।३।।
दणदण धावत येई रंगणी, मजला वर द्याया ।
तुकड्यादास शरण तुजला रे ! गजवदना ! सखया ।I४॥