आवडिने पूजिला गड्यांनो ! तो म्या गजवदन !

(चाल: पतीत पावन नाम ऐकुनी...)
आवडिने पूजिला गड्यांनो ! तो म्या गजवदन ! ।।धृ०|।
वाटे सुख हो ! मम हृदयासी, पाहुनिया चरण ।
मुकुट रत्नमय, सोंड विराजत, दुमदुमले   सदन |।१।।
मूलस्थानी वस्ति जयाची, चार दळी स्थान I
पदी घांगुरिया  रुणझुणुनीया, धावत   ये   दुरुन ॥२॥
शंकर- सुत हो ! बेंबि हिरा तो, मुक्तमाळ जाण l
सरस्वती-कांता ! ये रे राया ! तुकड्या करि नमन॥३॥