येउ दे दया, दया विठाबाई ! त्रिविध मज न सोसवे आई !
(चाल: अरे हरि ! प्यालो प्याला नामाचा.. )
येउ दे दया, दया विठाबाई ! त्रिविध मज न सोसवे आई ! ॥धृol।
नामी तारिले, भ्रष्ट रोगि नष्ट । वाटतो मीच तुला दुष्ट ।
बाळ नावडे, पाजी जहर-प्याला । तुझा अन्याय खरा केला ।
पातकी असा, धाव गे त्वरे माई ! ।। त्रिविध0॥१॥
ऐकुनी बोध, सुबोध संतांचा । त्रास वाटे ग प्रपंचाचा ।
मिळेना अन्न, गेला वेळ बाळपणचा I उमाळा कामक्रोधाचा ।
सुचेना काही, श्रीकृष्णाबाई ! ॥ त्रिविध ०॥२॥
असंख्यहि भक्त, तारिते ग ऐकोनी। आलो धावत मी चरणी।
पातकी जरी, तव बाळ जगज्जननी ! म्हणविसी जगी मोक्षदानी ! ।
शरण मी जाऊ, कुणा रखुमाबाई ! ।। त्रिविध0||३॥
नको जग-ताप, ताप सोसवेना । कृपादृष्टिने पाहि दीना ।
कासावीसअति, माय गे ! बोलवेना । पाजी माणिकासि पान्हा
गे मागे काही, लोळिन तव - पायी ॥ त्रिविध0।।४॥