मला वाटे, हरी ध्यावा की गुरुचे पाय वंदावे ।
(चाल: भनालाय स्थी )
मला वाटे, हरी ध्यावा की गुरुचे पाय वंदावे ।
कळेना कोण तो श्रेष्ठ ? शासण आरधी कुणा जावे ? ॥|धृ०॥
बोलती वेदश्रुति नेति कळेना देव तो कैसा ?
सांगती संत - महिमा ती, असे देवाहुनी बरवे ll१॥
अशाश्वत कोण ? समजेना, ब्रह्मरुप सर्व हे जगत ।
करी निर्माण तो ईश, कृणाची भक्ति कर भावे ? ll२॥
करूनि निर्माण या जीवा, आवरण देई मायेचे ॥
मूळ मायाच ईश्वर ती, वदे हो शास्त्र ते सहावे ॥३॥
अनुभव देतसे एक, गुरु - चरणाचा करि घोक ।
तो तुकडयादास लिन झाला, सदगुरु नाम हे उजवे ॥४॥