दुख: वारा हे, दुखः वारा हे, दुख: वारा विषयविकाराचे

(चालः घे करुणा गा घे करुणा..)
दुख: वारा हे, दुखः वारा हे, दुख: वारा विषयविकाराचे llधृ०।।
का फिरता मायामोह-जाळी, गेली न ये घडि कवणे वेळी ।
साधा रे ! सकरुण वनमाळी, भय त्यागा  यम - माराचे ।। १।।
क्षण तरि भजनी लावा डोळा, निष्कर्मी निज-प्रभु न्याहाळा ।
वृत्ति निमिष तरि हृदयी पाळा, दुख नाशिल भवभाराचे ।।२।।
रात्रंदिवस श्रमवित तनु गेला, वाहनि ओझे व्यर्थचि मेला
जो प्रभु-स्मरणा अवघा भुलला, दुख भोगिल यमद्वारीचे ॥३॥
तुकड्यादास म्हणे गुज साधा, तोडा ही भवबंधन-बाधा ।
साधा सदगुण,   गुरुपद - नादा, तुटती   पाश  करालाचे ।।४।।