भज भज भज भज सुमना ! रामनाम रे !
भजन ५२१
(चाल : मंगलमय नाम तुझे..)
भज भज भज भज सुमना ! रामनाम रे ! l।धृo॥
नाशिवंत देह तैचि येइ कामि रे !
स्मरशिल जरि दृढभावे मेघश्याम रे ! ।।१॥
स्थळि न एक फिरसि कसा ? भक्त पाहि रे !
चुकुनि जन्म - फेर मिळे स्वरुपधाम रे ! ।|२॥
देव गुरु एकचि ते, द्वैत नाहि रे !
उलट नाम स्मरत पदी करि मुकाम रे ! ॥३॥
आडकोजो-अंकित तुकड्यास सार हे ।
संसारी कर्मातुनि पार जा त्वरे ।।४॥