या रे ! या रे ! सज्जन हो या रे !

(चाल: धन्य तव करणी...)
या रे ! या रे ! सज्जन हो या रे ! ।
हरि - गुण  गाता  नाचा    रे ! l।धृo॥
गोंधळ सारा, पाहुनि न फसा रे ! ।
श्रीगुरुलाचि शरण   जा  रे ! ॥
मायिक जगा, भुलता पाहुनि रे ! l
अंती   साथि   न   कोणी   रे ! ।|१॥
राम-गुण गाता, तद्रुपचि व्हा रे ! ।
त्वंपद - तत्पद   शोधा  रे ! l।
मान -अपमान, सुख दुःख विसरा रे ! ।
टाकिल गळि यम - फासा  रे ! ।।२॥
अशाश्वत जग, याचा न भरोसा रे ! ।
आडकुजी गुरु तारक बा   रे ! ॥
त्वरित पहा पहा, याचि देहि डोळा रे !।
तुकड्यादास भोपळा रे ! ॥
सागरी तरला, पारचि काढा रे ! ।
हरिगुण     गाता    नाचा     रे ! ॥३॥