आडकोजी - चरणाचा मजला आधार रे !
(चालः इश्क तेरे पासमें तू..)
आडकोजी - चरणाचा मजला आधार रे ! I
नेत्र-आंधळ्यासि जसा काठिचा सहार रे ! ॥धृ०l।
जप-तप-नेमादि करुनि ना मिळेचि धूळ ही ।
चरण एक हृदयि धरुनि होइन मी पार रे ! ॥१।।
साधन ना सद्गुरुविण थोर या कलीयुगी ।
करिताचि स्मरण गुरु जाळि पाप- भार रे ! ॥२।।
अंतकाळि जव येईल चोर प्राण न्यावया ।
ज्ञानखड्ग घेउनिया सुखे त्यासि मार रे ! ll३॥
दावि मार्ग कोण दुजा सद्गुरुविना असा ?
तुकड्या म्हणे अंधासहि दृष्टि देइ सार रे ! ।।४।l