आत्मज्ञान, पाहिजे जरी तुजला
(चाल: धन्य तव करणी..)
आत्मज्ञान, पाहिजे जरी तुजला ।
सेवि गुरु - चरणाचा प्याला ॥धृ०॥
अधिक मग काय ? नको रे ! व्यवसाय ।
न ठेवी याती- कुळ- भय ॥
असे मी कोण ? सत्यासत्य पाहे ।
कोठे जाइन. लवलाहे ॥
आलिया जन्मा, शोधी देवाला ।। सेवि गुरु0।|१ll
देव तो कैसा ? त्या ओळखु जाता ।
अंगी बाणे हो ! देवरुपता ।।
विमल ते ज्ञान, शुध्द स्वरुप जाण ।
सहजची उडे रे ! अज्ञान ।।
जळासी जळ,मिसळा जव झाला ।। सेवि गुरु0।|२|।
गुरु आडकोजी ! शरण तुला आलो ।
तव पद स्मरता धन्य झालो ।।
तुकड्यादास, जग- पाशे बुडला ।
काढि बा! येउनिया त्याला ।।
लाभु दे, प्रभो ! आंधळ्याला ।। सेवि गुरु०॥३।l