भूक मला श्रीगुरु - चरणाची , आणिक जाणे काहि न मी
(चालः तेचि खरे हो ! अनुभवयोगी..)
भूक मला श्रीगुरु - चरणाची , आणिक जाणे काहि न मी ॥ धृ०।।
नको मला स्वर्गादिक सुख ते , नाशवंत म्हणती संत ।
गर्भवास घेउनिया जागा , गुरुचा सेवक होइन मी ।।१।।
कोणी जाती मथुरा - काशी , प्रयाग बदरी - द्वारवती I
सेवुनि चरण अखंड तयाचे , आनंदे गुण गाइन मी ।।२।।
जप - तप नेम - अनुष्ठानहि ते, स्वर्गा मोक्षा जायासी ।
तुकड्यादास आस ही मागे, आडकुजीला नित्य नमी ॥३।।